मुरुमे तेलकट त्वचेमुळे होतात असे म्हटले जाते, परंतु तसे नाही. मुरुमांची समस्या कोणत्याही त्वचेवर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता, त्यामुळे ते आणखी येतात. यामुळे अनेकजण त्रस्त होतात. यासाठी मुरुमांमागील खरे कारण माहित असणे फार महत्वाचे आहे. आपल्या काही सवयींमुळे ही समस्या वाढते. जाणून घेवूयात या सवयी.

1. वारंवार चेहरा धुणे
ज्या लोकांच्या चेहर्‍यावर मुरुम येतात, त्यांनी जर चेहरा पुन्हा पुन्हा धुवायला सुरूवात केली तर त्वचा कोरडी होते आणि खाज येते. साबण आणि टोनर वापरल्यामुळे त्वचेवर परिणाम होऊन मुरुमांची समस्या आणखी वाढते. यासाठी क्लीन्जर वापरा.

2. मानसिक ताण
होर्मोन्समधील बदलांमुळे मुरूमांची समस्या होते. यासाठी मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. आनंद देणारे काम करा. मानसिक ताण कमी झाला की, मुरमे त्रास देणार नाहीत.

3. अस्वच्छता
जर वेळोवेळी उशीचे कव्हर्स, बेडशीट आणि टॉवेल्स इत्यादी बदलत नसल्यास मुरुमांची समस्या होते. त्यातील घाण, धूळ आणि बॅक्टेरियांमुळे मुरुमांचा त्रास होतो. आरोग्याच्या इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.

4. मेकअप
मुरुमाची समस्या टाळायची असेल तर मेकअप साहित्याकडे लक्ष द्या. ब्रशेस, स्पंज आणि इतर उत्पादने वापरल्यानंतर नेहमीच स्वच्छ करा. अन्यथा, त्यावरील बॅक्टेरिया चेहर्‍याच्या संपर्कात येतात. यामुळे मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

5. आहार
आहाराचा आरोग्यावर परिणाम होतो. त्याचा परिणाम बाह्य शरीरावरही होतो. जर तुम्ही जास्त गोड, तळलेले-भाजलेले पदार्थ, पांढरा ब्रेड, पास्ता आणि मसालेदार अन्न खाल्ले तर मुरुमांच्या समस्या वाढते. म्हणून सकस, चांगला आहार घ्या.

दररोज वेगाने चालल्याने 32 टक्क्यांनी वाढेल आयुष्य !
हे’ अन्न खराब करु शकते तुमची किडनी, असे ठेवा स्वतःला निरोगी
थंडीत हृदयरोगाच्या रुग्णांनी ‘या’ 4 गोष्टींची घ्यावी खास काळजी
युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन’ झाल्यास ‘या’ 5 गोष्टींची घ्या काळजी !

error: Content is protected !!